वाहतूक कोंडी फुटणार
By Admin | Updated: August 5, 2016 03:05 IST2016-08-05T03:05:12+5:302016-08-05T03:05:12+5:30
वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार

वाहतूक कोंडी फुटणार
पंकज रोडेकर,
ठाणे- वाहनांची वाढती संख्या, अपुरे आणि अरूंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेत न झालेल्या सुधारणा यामुळे सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेजार झालेल्या प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने दहा उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर येत्या काही महिन्यांत ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशा प्रमुख शहरांतील वाहतूक कोंडी फुटेल.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे.
ठाण्यासह अन्य शहरांतून जाणारे राज्यातील प्रमुख मार्ग, माल आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, अपुरे-अरूंद रस्ते ही कोंडी प्रमुख कारणे आहेत. ती लक्षात घेऊन शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे.
> वाहतूक सुधारण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यासाठी नागरिकांचीही मते जाणून घेतली जाणार आहेत. यातून कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल, अशी अपेक्षा आहे.
- संदीप पालवे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.
>उपाययोजना कोणत्या?
वारंवार वाहतूक कोंडी
होणाऱ्या रस्त्यांचा विचार
कुठे वन-वे आणि कुठे नो-एण्ट्रीची गरज आहे? ते लक्षात घेऊन तशी व्यवस्था करणे
रस्त्यांतील अतिक्रमणे दूर करून
ते मोकळे करण्यासाठी महापालिकांकडे पाठपुरावा
वन वे किंवा नो एण्टीच्या
आजवरच्या सूचनांची अंमलबजावणी किंवा त्यात बदल
नवीन रस्ते व पुल उभारणे.
सिग्नल यंत्रणा बसविणे अवजड वाहनांना काही
काळासाठी बंदी
वेळ व वार यानुसार वाहतुकीचे नियोजन (उदा. बाजाराचे दिवस, विशिष्ट वारी गर्दी होणाऱ्या मंदिरांचा परिसर, शाळा सुटण्याच्या वेळा)