बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक
By Admin | Updated: April 8, 2017 04:46 IST2017-04-08T04:46:22+5:302017-04-08T04:46:22+5:30
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे.

बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे. या ट्रॅफिकब्लॉकमुळे रविवारी दिवसभर मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसेल. तसेच हार्बरवरही ब्लॉक नसेल. परंतु, ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरूळ मार्गावर दोन्ही दिशांवर सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत ब्लॉक असेल, असे जनसंपर्क विभागाने शुक्रवारी जाहीर केले आहे.
हा ब्लॉक ट्रान्स-हार्बरच्या दोन्ही दिशांवर असल्याने त्या कालावधीत ठाणे ते पनवेल, बेलापूर, वाशी या मार्गांवर तसेच तेथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्या कालावधीत ट्रान्स-हार्बरच्या प्रवाशांना मुख्य मार्गासह हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
शनिवारी मध्यरात्री ११.२० ते रविवारी पहाटे ३.२० या वेळेत बदलापूर स्थानकादरम्यान विशेष ट्रॅफिकब्लॉक आहे. त्या कालावधीत तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला स्वीच पॉइंट बदलून नवीन अद्ययावत यंत्रप्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.