पारंपरिक ‘कंदील’च सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:55 IST2016-10-17T01:55:27+5:302016-10-17T01:55:27+5:30

दिवाळी अगदी काहीच दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे.

The traditional 'lantern' is the mustard | पारंपरिक ‘कंदील’च सरस

पारंपरिक ‘कंदील’च सरस


मुंबई : दिवाळी अगदी काहीच दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. साफसफाईपासून ते फराळ करण्यापर्यंत साऱ्याच गोष्टींना वेग आला आहे. दिवाळीतल्या कंदिलांनीदेखील आता बाजार सजू लागले आहेत. विशेष म्हणजे, यंदाही पारंपरिक आकाराचा कंदील अधिक सरस ठरत आहे.
सध्या मुंबई आणि उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीला उधाण आले आहे. दिवाळी सजावटीतील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘कंदील’. या दिवसांत प्रत्येक घराबाहेर कंदील लावला जातो. कंदिलांचे विविध प्रकार बाजारात दाखल होत आहेत. अनेक मंडळांनी विक्रीसाठी कागदाचे, कापडाचे कंदील तयार करायला घेतले आहेत. जास्त दिवस टिकणारे आणि विविध आकारांत मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या कंदिलांना मध्यंतरीच्या काळात अधिक पसंती मिळत होती, पण गेल्या वर्षीपासून मात्र, अनेकांनी कागदाच्या आणि त्यातही पारंपरिक आकाराच्या कंदिलांना पसंती दिली आहे.
इको फ्रेंडली म्हणून गेल्या वर्षी कापडाच्या कंदिलांची चलती होती. यंदाही कापडाचे पारंपरिक आकाराचे कंदील अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्लॅस्टिकच्या कंदिलाप्रमाणे हे कंदीलदेखील उघडून ठेवण्याची सोय कापडाच्या कंदिलात करण्यात आली आहे. त्यामुळे ते उघडून ठेवता येण्यासारखे आहेत.
सध्या यातील लहान आकाराचा कंदील साधारण २०० ते २५० च्या घरात आहे, तर मोठ्या कंदिलाची किंमत ३५० हून पुढे आहे. दिवाळीला अजूनही थोडासा अवकाश असल्याने, या किमती कमी असून, दिवाळी दोन ते तीन दिवसांवर आल्यावर यांच्या किमती वाढतील, शिवाय पारंपरिक कंदिलांना वेगळा टच दिलेला पाहायला मिळेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
>मंडळाचे कंदील विक्रीला
अनेक मंडळांनी विक्रीसाठी कागदाचे तसेच कापडाचे कंदील तयार करायला घेतले आहेत.
मध्यंतरीच्या काळात प्लॅस्टिकच्या कंदिलांना अधिक पसंती मिळत होती. मात्र आता कागदी तसेच कापडी कंदील निवडले जात आहेत.

Web Title: The traditional 'lantern' is the mustard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.