ट्रॅक्टरने गर्भवतीला उडवल्याने ती जागीच ठार, पण पोटातलं बाळ सुखरूप आलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:54 IST2017-09-22T15:51:52+5:302017-09-22T18:54:39+5:30
आलेगाव कार्ला रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गर्भवती महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.

ट्रॅक्टरने गर्भवतीला उडवल्याने ती जागीच ठार, पण पोटातलं बाळ सुखरूप आलं बाहेर
अकोला: आलेगाव कार्ला रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गर्भवती महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात घटनास्थळी त्या महिलेची प्रसुती झाली. पण त्या महिलेचा मृत्यू झाला असून तिने जन्म दिलेलं बाळ सुखरूप असून त्याच्यावर आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत.
सुवर्णा सुपजी दांडळे या दुचाकीवरून आलेगाव येथे जात होत्या. कार्ला या गावाजवळ त्यांची दुचाकी असताना पातूर येथील अवैध रेती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली येऊन मागील पूर्ण चाक त्यांच्या शरीरावरून गेले. त्यामुळे महिलेच्या पोटातील बाळ बाहेर आले. आणि त्याला रुग्णवाहिकेने बाळाला अकोला येथे उपचार करिता हलविण्यात आले. मात्र ही महिला जागीच ठार झाली.या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरून फरार आहे
सदर महिला ही प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी जात होती. मोटरबसायकल चालक सरोदे तिचा नवरा व ती असे तिघे गाडीवर होते. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही महिला खाली पडली व ट्रॅक्टर च्या मागील चका खाली आली येथेच तिचा पोटातील बाळ बाहेर आले. अवघ्या 1 किमी अंतरावरील आरोग्य केंद्रामधून डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला तातडीने उपचार दिला.