शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 22:32 IST

कणकवली येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी झाली.

कणकवली - येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. प्रथम पर्यटकांनी दारू पिऊन हॉटेल मालकास मारहाण केली. हे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये ८ पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. तर ग्रामस्थांमधील दोघेजण गंभीर असून त्यांना गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.  ही घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. गुजरातवरून आलेली पर्यटकांची बस गोव्याला जात होती. त्यातील पर्यटक वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर जेवण करीत होते. या पर्यटकांपैकी काहीजण तेथील नजीकच्या हॉटेलात शीतपेय पिण्यासाठी गेले व येताना दारू पिऊन आले. दारूच्या नशेत धिंगाणा घालत हे पर्यटक हॉटेल मालकाजवळ आले. हॉटेल मालकाने त्यांना ग्लास धुऊन ठेवायला सांगितले. यावरून हॉटेल मालक व पर्यटक यांच्यात बाचाबाची झाली व पर्यटकांनी हॉटेल मालकास मारहाण केली. हॉटेल मालकास मारहाण झाल्याचे समजताच वागदे गावचे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये रेखाबेन संजय चौहान (२३), रतनबेन कानजी (७५), रमेश कानजी (५८), लालजीभाई (४६), राजेश गुलाबभाई चौहान (३५), हितेश गुलाबभाई चौहान (३६), जातने लालजीभाई चौहान (४६), नवलभाई लालजीभाई चौहान (७५, सर्व राहणार सौगणनगर, नोसावला, गुजरात) हे पर्यटक जखमी झाले. त्यांना प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.  दोन ग्रामस्थ गंभीर जखमीयातील पर्यटकांनी राजाराम भागोजी ताटे (रा. वागदे) व विजय अंकुश पांगम (बांदकरवाडी-कणकवली) या दोघांना मारहाण केली. या मारहाणीत या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.  ग्रामस्थ संतप्त याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वागदे ग्रामस्थांनी पोलीस स्थानक व उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पर्यटकांनी कारण नसताना हॉटेल मालकास मारहाण केल्याबद्दल वागदे ग्रामस्थ संतप्त झाले होते. पर्यटक भाजप गटाचे असल्याचे भासवून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ग्रामस्थांनी पर्यटकांच्या या कृतीचा निषेध केला आहे.  

टॅग्स :tourismपर्यटनkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र