शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र

By admin | Updated: June 6, 2015 01:55 IST

मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली

मुंबई : मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली तर रेवस बंदराच्या उभारणीला मंजुरी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी महिनाभरात मान्य केली जाईल, असेही गडकरी यांनी जाहीर केले.महाराष्ट्रातील डहाणुजवळ वधवान पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बंदरासंबंधी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारावर केंद्रीयमंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गडकरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे असलेल्या जेटीच्या ठिकाणी गेटवे आॅफ इंडियापासून ३५ कि.मी. अंतरावर नवे पर्यटन स्थळ सुरु करण्यासाठी ४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या ठिकाणी मनोरंजना बरोबर छत्रपती शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यावरील ध्वनीप्रकाशाचा एक कार्यक्रम सादर केला जाईल. आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करुन मे २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. याखेरीज रत्नागिरी येथे मेरीटाईम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याकरिता १०० एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विजयदुर्ग येथे दोन तेल शुद्धीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याकरिता केंद्र सरकार पैसे उपलब्ध करून देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची तक्रारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवस प्रकल्पाला केंद्राने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्याकरिता केंद्राकडून केली जाणारी पैशाची मागणी अवास्तव असल्याची तक्रार फडणवीस यांनी केली. ही मागणी महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.