पीक कर्जमाफी उपसमिती तीन राज्यांचा दौरा करणार

By Admin | Updated: June 10, 2017 02:54 IST2017-06-10T02:54:40+5:302017-06-10T02:54:40+5:30

शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या माफीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीकडून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा

Touring the peak debt waiver sub-committee will go to three states | पीक कर्जमाफी उपसमिती तीन राज्यांचा दौरा करणार

पीक कर्जमाफी उपसमिती तीन राज्यांचा दौरा करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या माफीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीकडून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा अभ्यास दौरा केला जाणार आहे. २१ ते २३ जून या कालावधीदरम्यान हा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अभ्यास दौऱ्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची उपसमिती स्थापन केली आहे. ही उपसमिती सहकारी बँका, शासकीय बँका तसेच व्यापारी बँकांकडे असलेल्या पीककर्जांची माहिती संकलित करण्याचे काम करीत आहे.

Web Title: Touring the peak debt waiver sub-committee will go to three states