नोकरीचे आमिष दाखवून तरुणावर अत्याचार

By Admin | Updated: January 9, 2017 15:46 IST2017-01-09T15:46:55+5:302017-01-09T15:46:55+5:30

एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून दोन नराधमांनी त्याच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Torture on youth by showing bait for job | नोकरीचे आमिष दाखवून तरुणावर अत्याचार

नोकरीचे आमिष दाखवून तरुणावर अत्याचार

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि 9 : एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून दोन नराधमांनी त्याच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. पीडित तरुण २८ वर्षांचा आहे. काहीसा नाजूक प्रकृतीचा असलेला हा तरुण बेरोजगार असल्याने तो रोजगार शोधण्यासाठी दिवसभर ईकडे तिकडे फिरतो. दोन आठवड्यांपुर्वी सिव्हील लाईनमधील प्रशासकीय ईमारतीजवळ उभा असताना तेथे ठाकरे (वय अंदाजे ५२ वर्षे) आणि काळे (वय अंदाजे ५५ वर्षे) या दोघांनी त्याला जवळ बोलविले. विचारपूस केल्यानंतर तरुणाने बेरोजगारीला कंटाळल्यामुळे आपण काहीही करायला तयार असल्याचे पीडित तरुणाने सांगितले. त्याच्या अगतिकतेचा फायदा उठवून आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून दिवसभर त्याला आपल्या सोबत ठेवले आणि प्रशासकीय ईमारत क्रमांक २, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या बाथरूममध्ये त्याच्यावर पाच ते सात वेळा अत्याचार केला. त्यानंतर त्याला दुस-या दिवशी बोलविले.

प्रकृती खराब झाल्याने पीडित तरुण दुस-या दिवशी येऊ शकला नाही. त्यानंतर तो ७ जानेवारीला आरोपीकडे आला असता त्या दोघांनी त्याच्यावर पुन्हा रवीभवन बंगल्यामागे दुपारी ४ च्या सुमारास अत्याचार केला. नंतर नोकरीचे नाव काढताच शिवीगाळ करून हाकलून लावले. त्यामुळे तरुणाने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.पोलिसांनी या प्रकरणी ठाकरे आणि काळे या दोघांविरुद्ध अनैसर्गीक अत्याचाराच्या आरोपाखाली कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला. 

Web Title: Torture on youth by showing bait for job