भूतबाधेच्या नावाखाली अत्याचार

By Admin | Updated: January 9, 2015 01:57 IST2015-01-09T01:57:02+5:302015-01-09T01:57:02+5:30

गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी नाका येथे एका भोंदू बाबाच्या घरी घरकामासाठी जाणाऱ्या महिलेवर तिच्या मुलीला भूतबाधा झाली आहे,

Torture in the name of ghosts | भूतबाधेच्या नावाखाली अत्याचार

भूतबाधेच्या नावाखाली अत्याचार

वजे्रश्वरी : गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी नाका येथे एका भोंदू बाबाच्या घरी घरकामासाठी जाणाऱ्या महिलेवर तिच्या मुलीला भूतबाधा झाली आहे, असे भासवून तिला उपचार करून बरे करण्याच्या नावाखाली दीड महिना अत्याचार केल्याची घटना घडली.
प्रभाकर सावळाराम पाटील (५०) असे या ढोंगी बाबाचे नाव आहे. ही पीडित महिला पती आणि ८वर्षीय मुलीसह येथे राहत असून, ती एकट्या राहणाऱ्या ढोंगी बाबाकडे घरकामासाठी जात असे. तिच्या मुलीला लहानपणापासून फिट येऊन अधूनमधून झटके येतात. तेव्हा पीडित महिलेच्या गरिबीचा व अडाणीपणाचा फायदा घेऊन तुझ्या मुलीला भूतबाधा झाली आहे. तिला मी बरे करेन, असे सांगितले. तिचा पती कामानिमित्त जळगाव येथे गेल्यावर तिला धमकावून दीड महिना तिच्यावर अत्याचार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Torture in the name of ghosts