शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मुसळधारेचा इशारा, मराठवाड्यात तूर्तास दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:17 IST

आलापल्ली-भामरागड मार्ग बंद; लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात संततधार

गडचिरोली/मुंबई  :  जिल्ह्याला शुक्रवारी  सलग तिसऱ्या दिवशी संततधार पावसाचा तडाखा बसला. नद्या, नाले तुडुंब झाले असून, भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडसह शंभरवर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मराठवाड्यातील जिल्हांनाही पावसाने दिलासा मिळाला.पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील पाच मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली होती.२४ तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील नऊ विभागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे.  पुढील २४ तासांत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्याला दिलासापरभणी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोनपेठ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.बीड : शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला. दुपारी थोड्या वेळ विश्रांतीनंतर पुन्हा तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.लातूर : सव्वा महिन्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाची रिमझिम बरसात सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे.नाशिक : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासूनच शहर व परिसरात सरींचा वर्षाव केला.   

राज्यातील २९९७ धरणांत ६४.९० टक्के जलसाठाखामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात २९९७ जलसाठ्यांमध्ये एकूण ६४.९० टक्के जलसाठा नोंदविला गेला असून, तो गतवर्षीच्या याच कालखंडातील साठ्यापेक्षा अधिक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गतवर्षी याच काळात राज्यातील एकूण साठा ४७.९४ टक्के इतका होता.विभागनिहाय पाणीसाठाविभाग     साठा (टक्केवारीत)नागपूर     ५३.२१अमरावती     ५२.८९छ. संभाजीनगर     ४९.५५नाशिक     ६१.०९पुणे     ७६.००कोकण     ८२.२९

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र