शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपला : राज ठाकरे

By Admin | Updated: February 1, 2017 20:52 IST2017-02-01T20:52:30+5:302017-02-01T20:52:30+5:30

युतीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला, सात वेळेस फोन केले, एकदाही फोन उचलला नाही.

The topic of the alliance with Shiv Sena ended for me today: Raj Thackeray | शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपला : राज ठाकरे

शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपला : राज ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - युतीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला, सात वेळेस फोन केले, एकदाही फोन उचलला नाही. भाजपाला दुखवायची शिवसेनेची  इच्छा नाही .  शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आतून एकमेकांना मिळालेले आहेत असं म्हणत शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केलं. दादरच्या शिवाजी मंदिरात मनसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी राज बोलत होते. 
 
कल्याण डोंबिवलीला जे झालं तेच इथेही सुरु आहे, आधी भांडले मग पुन्हा एकत्र आले, भाजपा नको म्हणून शिवसेनेला युतीचा हात पुढे केला होता. राज ठाकरे स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही पण मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटेल  असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना- भाजपावर टीकेचा भडीमार केला.

Web Title: The topic of the alliance with Shiv Sena ended for me today: Raj Thackeray