शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेत देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्र, 3 वर्षात 42 हजार कोटींचे कर्ज वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 16:28 IST

‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेत’ महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात  42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.

नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेत’ महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात  42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरू केली. या योजनेत शिशु, किशोर व तरुण कर्ज अशा तीन टप्प्यात बँकांमार्फत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.तीन वर्षात महाराष्ट्रात 91 लाख कर्ज प्रकरणे मंजूर-या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात 91 लाख 53 हजार 619 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून 44 हजार 49 कोटी  17 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे व  42 हजार 860 कोटी 43 लाख रुपये लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. सन 2015-16 या वर्षात 13 हजार 372 कोटी 42 लाख रुपयांचे कर्ज  प्रत्यक्षात वितरित करण्यात आले. 2016- 17 या वर्षात 16 हजार कोटी 976 लाख 76 हजार तर 2017-18 या वर्षात 12 हजार 511 कोटी 25 लाख इतके कर्ज प्रत्यक्षात लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले.देशात 4 लाख कोटीचे कर्ज वितरण-मुद्रा योजनेत तीन वर्षात 10 कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लघु उद्योगांना 4 लाख 43 हजार 496 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू ही राज्ये मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये टॉप तीनमध्ये समाविष्ट आहेत. या तीन राज्यात 40 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज गेल्या तीन वर्षात वितरित झाले आहे. तरुणकर्ज प्रकारात महाराष्ट्र देशात अव्वल, 12 हजार कोटींचे कर्ज वितरण-मुद्रा योजनेतील तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. या प्रकारात 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. गेल्या तीन वर्षात तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्रात 12 हजार 176 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहे. किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यामध्ये राज्यात तीन वर्षात  11 हजार 956 कोटी 95 लाख तर शिशु कर्ज गटात 18 हजार 727 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. शिशु गटात 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो.  

टॅग्स :Pradhan Mantri Mudra Yojanaप्रधानमंत्री मुद्रा योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र