शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या

By admin | Updated: April 14, 2017 20:58 IST

राजकीय, क्राईम, मनोरंजन तसेच देश-विदेशात घडलेल्या दिवसभरातल्या महत्वाच्या 10 घडमोडी वाचा एका क्लिकवर

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे.  (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/UkpA9G

अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळांवर अमेरिकेने गुरुवारी केलेल्या शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात 36 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये केरळमधून इसिसमध्ये भरती झालेल्या तरुणाचाही समावेश आहे. याशिवाय यामध्ये अन्य 20 भारतीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात इसिसला लक्ष्य करताना जीबीयू-43/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) हा महाशक्तिशाली बॉम्ब टाकला त्यावेळी हे भारतीय त्याच परिसरात उपस्थित होते. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/doW8Nw)उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या लवकरच बंद केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/lvl9wn)डिजीधनचा जो मंत्र भारत सरकारने देशाला दिला आहे. त्याव्दारे अर्थव्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला. नागपुरातील मानकारपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी आयोजित ह्यभीम आधार अ‍ॅपह्ण च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/Sk6Vfo)आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात झाली आहे. ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात नोटाबंदीदरम्यान संशयितरित्या आर्थिक व्यवहार करणा-या 18 लाख लोकांना नोटीस पाठवली होती. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/tNFWij)देशातील एक कोटी बँकधारकांच्या खात्याची माहिती लीक झाली असून विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँक खात्यांशी संबंधित ही खासगी माहिती अत्यंत कमी दरात विकली जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात फक्त 10 ते 20 पैशांमध्ये तुमच्या खात्याशी संबंधित माहिती विकली जात असल्याचं समोर आलं आहे. ( सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/yzRC93)दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना जोरदार झटका दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आपली रणनिती बदलली आहे. यापुढे दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य न करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/sJk6wd)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिस-या विजयाची नोंद केली. बंगळुरुने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात अत्यंत दयनिय झाली. केवळ 7 धावांवरच मुंबईचे 4 खेळाडू बाद झाले होते. (सविस्तर बातमीसाठी -  https://goo.gl/CBiJ47)संजय दत्तच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटींगमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर व्यस्त आहे. पण या सिनेमाचं चित्रीकरण थांबवावं लागलं आहे. रणबीर संजय दत्तच्या पाली हिल येथील घराबाहेर शूटिंग करत होता मात्र, संजय दत्तच्या शेजा-यांनी याला विरोध केला आणि याविरोधात निदर्शनं केली. (सविस्तर बातमीसाठी  https://goo.gl/q9EgNN)सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर लवकरच नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हा सिनेमा साकारत आहे. "एफयू" असं या सिनेमाचं नाव असून आकाशचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. (सविस्तर बातमीसाठी  https://goo.gl/llmlqH)