शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेत सलग तेरा वर्षे काेकण पहिला; यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:33 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.५ टक्का वाढला असून, यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. कोकण विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक (९८.६१) टक्के निकाल लागला आहे. 

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. काेकण मंडळाचा एकूण निकाल ९७.५१ टक्के लागला असून, राज्यातील नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाने सलग १३ व्या वर्षी राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.५ टक्का वाढला असून, यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. कोकण विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक (९८.६१) टक्के निकाल लागला आहे. 

प्रात्यक्षिकचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर लागलापुणे : राज्य मंडळाने गतवर्षीपेक्षा लवकर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पाेर्टलच्या माध्यमातून घेतल्यामुळे परीक्षेचा निकाल लवकर जाहीर हाेण्यास अत्यंत चांगला उपयाेग झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली. यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

गुणपडताळणीसाठी २२ मेपासून अर्ज  गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिका छायाप्रत मागविण्यासाठी २२ मे ते ५ जून पर्यंत ऑनलाइन शुल्क भरून अर्ज करता येईल. 

विभागीय स्तरावर समुपदेशकइयत्ता दहावी-बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसिक दडपण अथवा नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील आठ दिवस मंडळातर्फे समुपदेशन सेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी सेवेचा फायदा होणार आहे.   

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग