शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कर्जमाफीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू करणार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:45 AM

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोेटींची छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली.

नागपूर  - राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोेटींची छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. यातील ३८ लाख शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करताना जी खाती जुळलेली नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी माहिती मिळण्याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य हेमंत टकले, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अद्याप सरसकट सर्व शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या घोषनेनंतरही राज्यात सुमारे एक हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. जाचक अटी व सदोष कार्यप्रणालीमुळे अनेक शेतकरी कर्ज माफीच्या योजनेपासून वंचित आहेत. सर्व शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील ३५ शेतकºयांच्या यादीत त्रुटी असून ती पोर्टलवर दिसत नसल्याचे हेमंत टकले यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे हरिसिंग राठोड म्हणाले. कर्जमाफीच्या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सुभाष देशमुख यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.क्रेडिट सोसायटीच्या गैरव्यवहाराची दोन महिन्यात चौकशीमुंबई जेट एअरवेज एम्प्लॉईज को.आॅप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या गैरव्यवहाराची आर्थिक व प्रशासकीय चौकशी दोन महिन्यात करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य किरण पावसकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ,१९६० अन्वये चौकशी करण्याकरिता ३० डिसेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकाºयांमार्फत संबंधित अपहाराची चौकशी सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. क्रेडिट सोसायटीने कर्जवाटप करताना कर्जदाराला मिळणाºया वेतनापेक्षा कर्जाचा हप्ता अधिक येत आहे. असे कर्ज वाटप केल्याचे पावसकर यांनी निदर्शनास आणले. हेमंत टकले, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरी