आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका
By Admin | Updated: August 24, 2016 02:55 IST2016-08-24T02:55:19+5:302016-08-24T02:55:19+5:30
पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तर मेढा, साजगाव, पोशिर,शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बुधवारी होत आहे.

आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तर मेढा, साजगाव, पोशिर,शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बुधवारी होत आहे. आठ विविध मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायं ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही मिळून १२ जागांसाठी २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने लावला आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमधील सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी आता १४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील विविध ८१ ग्रामपंचायतीमधील १३२ जागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. १३२ पैकी १११ जागांसाठी कोणी अर्जच केले नाहीत. त्यामुळे २१ जागांसाठी निवडणूक निश्चित झाली आहे.
>१६ जागा बिनविरोध
खालापूर तालुक्यातील कलोते, कर्जत तालुक्यातील कडाव, उमरोली, पळसदरी, पेण तालुक्यातील वरप, उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, पाणजे, पनवेल तालुक्यातील पळस्पे, तळा तालुक्यातील पढवण, महाड तालुक्यातील अप्पर तुडील, मुरुड तालुक्यातील बोर्ली, उसरोली या १२ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या १६ जागा या बिनविरोध निवडून आल्या.