Sharad Pawar: काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? शरद पवारांनी परखड शब्दात सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:57 PM2021-09-09T20:57:02+5:302021-09-09T21:02:23+5:30

आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

Today's Congress is like a landlord in Uttar Pradesh, says Sharad Pawar | Sharad Pawar: काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? शरद पवारांनी परखड शब्दात सुनावलं

Sharad Pawar: काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? शरद पवारांनी परखड शब्दात सुनावलं

Next
ठळक मुद्देकाँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही.

मुंबई - काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, आजच्या काँग्रेसची(Congress) अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय. असं असलं तरी काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच असं पवारांनी सांगितले. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी परखड मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा शरद पवार(Sharad Pawa) म्हणाले, ‘तिथंक काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल असंही शरद पवार यांनी सांगितले आहे.

प्रशांत किशोरची मला गरज नाही

मागील काही काळात दिल्लीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची प्रचंड चर्चा आहे. याच प्रशांत किशोर यांनी पवारांची दोनदा भेट घेतल्यानंतर पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी ते दिल्लीत मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चाही सुरू झाली. या चर्चेवर पवारांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. मला प्रशांत किशोरची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशा शब्दांत पवारांनी आपली भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, याबद्दल सुतोवाच केलं.

Web Title: Today's Congress is like a landlord in Uttar Pradesh, says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.