सयामींची आज ‘थ्री-डी’ तपासणी

By Admin | Updated: August 2, 2016 05:44 IST2016-08-02T05:44:03+5:302016-08-02T05:44:03+5:30

पुढचे दोन दिवस सयामी जुळ््यांचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्यात येणार आहे.

Today's '3-D' inspection of Sanyamis | सयामींची आज ‘थ्री-डी’ तपासणी

सयामींची आज ‘थ्री-डी’ तपासणी


मुंबई : सायन रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ््यांना विलग करण्याची शस्त्रक्रिया करण्याआधी त्यांच्या शरीरातील अंतर्गत रचना सुस्पष्टपणे समजून घेण्यासाठी पुढचे दोन दिवस सयामी जुळ््यांचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्यात येणार आहे.
सायन रुग्णालयात २७ जुलै रोजी सयामी जुळ््यांचा जन्म झाला. या मुलांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांची शरीरे छातीपासून जोडलेली आहेत. यातील एका मुलाच्या शरीराची वाढ पूर्ण झाली आहे. या बाळांना एकच हृदय, एक यकृत आणि दोन मूत्रपिंडे आहेत. या बाळांचा जीव वाचवण्यासाठी दोघांना विलग करणे आवश्यक आहे. त्या आधी त्यांच्या शरीर रचनेविषयी माहिती होणे गरजेचे आहे. एमआरआय, सीटीस्कॅन करण्यात आले, पण त्यातून सयामी जुळ््यांच्या शरीर रचनेची स्पष्ट कल्पना येत नाही. त्यामुळे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्यात येणार असल्याचे मत सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.
सयामी जुळी मुले ही अत्यंत दुर्मीळ प्रकारची आहेत. या मुलांच्या अवयवांमधील ‘कोआॅर्डिनेशन’ पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या डॉक्टर त्याविषयी अभ्यास करत आहेत. या जुळ््यांची एका विशिष्ट प्रकारची तपासणी डॉक्टरांना करायची आहे, पण ही तपासणी मुंबईत फक्त जसलोक रुग्णालयात होते, पण या बाळांना घेऊन जसलोक रुग्णालयात जाणे शक्य नाही. तेथील डॉक्टर सायन रुग्णालयात येऊन तपासणी करतील, असा प्राथमिक अंदाज
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's '3-D' inspection of Sanyamis