आज, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:58 IST2022-08-17T06:40:29+5:302022-08-17T06:58:40+5:30
National Anthem : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे.

आज, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशप्रेम व्यक्त करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यात एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायले जाईल. नागरिकांनी समूहाने किंवा वैयक्तिक आणि ते जिथे असतील तिथून राष्ट्रगीत गावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चला, सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करूया’ असे आवाहन केले आहे. मात्र या उपक्रमाबद्दल रेल्वेला काहीही माहिती नाही.
एसटीलाही उशिरा सूचना मिळाल्या आहेत. पण या काळात वाहतूक खोळंबू नये, यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे.