शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"या लोकांना 'दादा' गेल्याचं दुःख नाही, VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी..."; रोहित पवारांचा खळखळबजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:03 IST

अपघातग्रस्त VSR कंपनीवर का कारवाई होत नाही याचा शोध आम्ही घेतला तेव्हा अनेक माहिती समोर आली

मुंबई - लिअरजेट विमान भारतात नोंदणी होऊ शकत नाही. परंतु DGCA अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहींनी या विमान कंपनीची नोंदणी भारतात केली. हे विमान अमेरिकेतील कंपनीकडून विकत घेतले होते. ४ ते ५ वेळा या विमानाची खरेदी विक्री झाली होती. नियम डावलून या विमानाचं भारतात रजिस्ट्रेशन कसं करण्यात आले असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून खळबळजनक आरोप केले. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विमान अपघातात तपासातील बारकावे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. रोहित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात होऊन तपास करणारे अधिकारी संध्याकाळी तिथे पोहचले होते. लिअरजेट विमान नेमकं कसे असते, त्यात काय तंत्रज्ञान आहे याबाबत तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. आमच्यासारखा विना सत्तेचा माणूस इतकी माहिती बाहेर काढू शकतो, मग इतकी यंत्रणा असूनही तपास पुढे का जात नाही. १५ फेब्रुवारीपर्यंत अपघाताचा अहवाल दिला जावा असा आदेश काढला होता. मग त्याचे काय झाले? असं त्यांनी विचारले.

VSR कंपनीवर का कारवाई होत नाही?

अपघातग्रस्त VSR कंपनीवर का कारवाई होत नाही याचा शोध आम्ही घेतला तेव्हा अनेक माहिती समोर आली. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात कोण कोण गेले होते याचे फोटो आहेत. त्यात आपल्या राज्याचे सत्ताधारी नेते लग्नाला गेले होते. VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या मुलाच्या लग्नासाठी आंध्र प्रदेशच्या टीडीपी पक्षाचे प्रमुख नेतेही गेले होते. सत्तेतले बरेच नेते VSR कंपनीतील मालकाशी निगडीत आहेत. त्यात टीडीपीचे नेतेच नागरी वाहतूक उड्डाण मंत्री केंद्रात आहेत. ज्या कंपनीच्या माध्यमातून हा विमान अपघात झाला त्याचा मालक आज भारतात नाही. VSR कंपनीला मुद्दामाहून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजितदादा गेले याचे दु:ख सत्तेतला माणसांना नाही परंतु VSR मालकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. काही लोक मुद्दामाहून यात राजकारण आणतायेत, गुंतवणूकदार कोण आहेत हेदेखील आम्हाला माहिती आहे. १००-२०० कोटींसाठी तपासात हस्तक्षेप करण्याचं काम करू नका कारण आमचा काका या अपघातात गेला आहे असंही त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, VSR कंपनीचा मालक विजय सिंग यांचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. त्यांचा मुलगा रोहित सिंग यालाही शोधा. अजितदादांच्या घातपातीचा मुद्दा मी मांडतोय, पण मला भाजपाच्या लोकांकडून ट्रोल का केले जात आहे? समित ठक्कर नावाचा व्यक्ती आहे त्याने एक ट्रोल केले होते. त्यानेच २८ फेब्रुवारीच्या अपघाताच्या २ दिवस आधीच एक ट्विट केले होते. राज्यात एक अशी घटना घडणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होते. मात्र काही वेळात त्याने हे ट्विट डिलिट केले होते. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांबाबत लोकांना संशय यायला लागला आहे असंही रोहित पवारांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar alleges cover-up in Ajit Pawar's plane crash, favors VSR.

Web Summary : Rohit Pawar alleges a cover-up to protect VSR company after Ajit Pawar's plane crash. He questions the investigation's slow pace and links between VSR's owner and ruling party leaders, suggesting a political motive. He demands investigation into VSR owner's calls and his son.