टिटवाळाकरांनी मोठ्या स्क्रीनवर अनुभवला सिंधूच्या फायनलचा थरार

By Admin | Updated: August 19, 2016 23:01 IST2016-08-19T23:01:04+5:302016-08-19T23:01:04+5:30

येथील निमकर नाका येथे सिल्वर मेडलवर नाव कोरणा-या पी.व्ही. सिंधूची फायनल बॅडमिंटन मॅच पाहण्यासाठी प्रचंड मोठा स्क्रीन लावण्यात आलेला होता.

Titvalkar thrashed the finishing touches of Sindhu's experience on the big screen | टिटवाळाकरांनी मोठ्या स्क्रीनवर अनुभवला सिंधूच्या फायनलचा थरार

टिटवाळाकरांनी मोठ्या स्क्रीनवर अनुभवला सिंधूच्या फायनलचा थरार

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. १९ :- येथील निमकर नाका येथे सिल्वर मेडलवर नाव कोरणा-या पी.व्ही. सिंधूची फायनल बॅडमिंटन मॅच पाहण्यासाठी प्रचंड मोठा स्क्रीन लावण्यात आलेला होता. सदर मॅच बघण्यासाठी क्रिडा प्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. सदर स्क्रीनची व्यवस्था मांडा-टिटवाळा करांसाठी शिवसेना - युवासेनेच्या वतीने संध्याकाळी ठिक 7.30 वाजता निमकर नाक्यावर लावण्यात आला होता. फायनलचा थरार अनुभवण्यासाठी शेकडो रसिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. याचे आयोजन किशोर(भाई) शुक्ला, विजय(भाऊ) मारुती देशेकर व अ‍ॅड.जयेशराव वाणी यांनी केले होते.

Web Title: Titvalkar thrashed the finishing touches of Sindhu's experience on the big screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.