शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:44 IST

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देराज्यात पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़. जमिनीवर आल्यावर ते ईशान्यकडे जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र तसेच मध्य भारतात त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता नाही़. राज्यात पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. राज्यात सर्वाधिक जास्त कमाल तापमान अकोला येथे ३७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर झाले असून सध्या ते ओडिशातील गोपाळपूर येथून ५३० किमी आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम येथून ४८० किमी दूर आहे़. हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ११ आॅक्टोंबरला धडकण्याची शक्यता आहे़. यावेळी वाºयाचा वेग ताशी १०० किमी इतका असू शकतो़. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. तसेच ११ व १२ आॅक्टोंबरला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मेझोराम, त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़. १२ आॅक्टोंबरला कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसOdishaओदिशाAndhra Pradeshआंध्र प्रदेशgoaगोवाwest bengalपश्चिम बंगाल