शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ; ठाकरे सरकारचं दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:27 IST

४ महिन्यांचे १२५ कोटी रूपये थकीत : भत्ता देण्यासाठी निधीच नाही

ठळक मुद्देविविध सण, उत्सव, निवडणुका, सभा, महोत्सवावेळी कायदा व सुव्यवस्था कायम राहावी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डही बंदोबस्तामध्ये तैनात असतात.चार महिन्यांपूर्वी  सरकारने विभागाला ५५ कोटी  देऊन २ महिन्यांचे  देणे भागवले होते

जमीर काझी

मुंबई : दिवस-रात्र  बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलिसांच्या बरोबरीने राबणाऱ्या राज्यातील ४२ हजारांवर होमगार्ड व त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उपासमारीची वेळ आली आहे. कारण हे होमगार्ड गेल्या चार महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. या जवानांचे  एप्रिलपासून जुलैअखेरपर्यंतचे सुमारे १२५ कोटी  मानधन थकले आहे. हे मानधन देण्यासाठी महासमादेशक कार्यालयाकडे निधीच शिल्लक नाही. 

विविध सण, उत्सव, निवडणुका, सभा, महोत्सवावेळी कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डही बंदोबस्तामध्ये तैनात असतात. मानसेवी तत्त्वावर राबत असलेल्या या जवानांची संख्या ४२ हजारांवर आहे. एका दिवसासाठी त्यांना ६७० रुपये मानधन  दिले जाते. दोन वर्षांपूर्वी ३०० रुपयावरून  ते वाढविण्यात आले होते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात  केलेली नव्हती. त्यामुळे निधीचा तुटवडा जाणवत आहे. 

चार महिन्यांपूर्वी  सरकारने विभागाला ५५ कोटी  देऊन २ महिन्यांचे  देणे भागवले होते. त्या होमगार्डनी थकीत मानधनाची पर्वा न करता कोरोनाच्या कार्यकाळात सुरक्षारक्षकाची भूमिका जबाबदारीने पार पाडली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

होमगार्डच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यताहोमगार्ड भत्ता आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेपोटी ते उसनवार आणि छोटी-मोठी कामे करीत उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, आता कोरोनामुळे  सर्वांना फटका बसत असल्याने  पैसे मिळणे दुरापास्त झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. थकीत मानधन न दिल्यास त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

थकीत भत्त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावाहोमगार्डचे थकीत मानधन मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून,  त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - प्रशांत बुरडे (उपमहासमादेशक, होमगार्ड)

सोमवारपर्यंत निधीची पूर्तता होमगार्ड विभागाच्या थकीत रकमेची पूर्तता केली जाईल. सोमवारपर्यंत आवश्यक निधी वर्ग करण्यासाठी आपण प्रयत्न  करत आहोत.- दिलीप वळसे-पाटील (गृहमंत्री)

टॅग्स :PoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील