सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील
By Admin | Updated: July 17, 2016 18:10 IST2016-07-17T15:28:48+5:302016-07-17T18:10:08+5:30
सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे

सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी सैराट स्टईल टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलतं होते.
भाजपातील नेत्यांचा आपाआपसातमधील संवाद योग्य नाही, हे सरकार ट्विटरवर चालतंय का? मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्ट्राचाराचा विस्तार होय असं ही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, कर्जतची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी. निर्भया पेक्षा भयामक कृत्य घडले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वेळ मिळू नये. ही गंभीर घटना आहे. मतदारसंघातले मंत्री कारभार घ्यावा की नाही याच चिंतेत आहेत. हा खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. मुख्यमंत्री एकही शब्द याबाबत बोलले नाहीत. हे दुर्दैवचं.
खडसे यांना क्लिन चिट यांत नवल नाही. अनेक निर्णयावर न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. मंत्र्यामधला विसंवाद चिंताजनक आहे. हे सरकार ट्विटरवरून चालतेय. पक्षाच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. हे अनाकलनिय. भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण अन नेकरदाराच्या वतीनं राज्य सुरूय. त्यामुळं सरकारचं अस्तित्व कुठंही जाणवत नाही.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार