शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

लालबागच्या राजाच्या प्रभावळीवर यंदा कासवाची आरास, बाप्पाच्या प्रथम मुखदर्शनासाठी भक्तांची गर्दी 

By बाळकृष्ण परब | Published: August 21, 2017 11:43 PM

मुंबई, दि. 21 -   मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले. सोमवारी संध्याकाळी ...

मुंबई, दि. 21 -   मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे सोमवारी प्रथम मुखदर्शन झाले. सोमवारी संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले. सालाबादप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सिंहासनावर चक्क कासवाची आरास करण्यात आली आहे. लालबागच्या राजाची गणेशमूर्ती ही दरवर्षी सारखीच ठेवण्यात येत असली तरी त्याच्या सिंहासनामध्ये दरवर्षी बदल करण्यात येत असतात. त्यामध्ये बाप्पाची प्रभावळ वैशिष्टपूर्ण ठेवण्याकडे कल असतो. गतवर्षी बाप्पांच्या प्रभावळीवर घुबडाला स्थान देण्यात आले होते. बाप्पांच्या मखरावर अशुभ मानल्या जाणाऱ्या  घुबडाल प्रभावळीवर स्थान देण्यात आल्याने त्यावर टीका झाली होती. मात्र राजाच्या प्रभावळीवरील घुबडाची गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात फार चर्चा झाली होती. दरम्यान, यावर्षीच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या सिंहासनाची सजावट कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. सोमवारी रात्री झालेल्या प्रथम मुखदर्शन सोहळ्यात बाप्पांच्या सिंहासनावरील कासवांची आरास पाहून भक्त चकीत झाले. या आराशीमध्ये बाप्पांच्या प्रभावळीवर पूर्णपणे कासवाचे चित्र आहे. तर आसनाच्या चारही खुरांवरही कासवांच्या मूर्ती आहेत. 

अधिक वाचा लालबागच्या राजाला अकोल्याचे जानवVIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !  तयारी गणेशोत्सवाची : खरेदीसाठी ग्रामस्थांची लगबग, सासवडला गणेशमूर्तीवर अखेरचा हात....चतुर्थीच्या दिवसांमध्ये  लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत असतात. .या मंडळाने महारक्तदान शिबीर आयोजित केले होते. या महारक्तदान शिबिरात १११०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या. या रक्तपिशव्यांपैकी १००० ते १२०० रक्तपिशव्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी विमानाने पाठविण्यात आल्या असून राज्यातील नागपूर व औरंगाबाद या भागातील काही दुर्गम भागात देखील या रक्तपिशव्यांचे वितरण करण्यात  आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली होती. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात. राज्यातील तसेच देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात भासणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळामार्फत ६ ऑगस्ट रोजी लालबाग परिसरात स्वैछिक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव