VIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:13 PM2017-08-17T21:13:41+5:302017-08-17T21:16:15+5:30

- स्नेहा मोरे मुंबई, दि. 17 - आठवड्याभर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत. चित्रशाळेतून ढोलताशांच्या गजरात ...

VIDEO - Bappa will not make lakhs of ornaments! | VIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !  

VIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !  

Next

- स्नेहा मोरे
मुंबई, दि. 17 - आठवड्याभर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत. चित्रशाळेतून ढोलताशांच्या गजरात गणेशोत्सवाच्या उंचच उंच मूर्तींचे आगमन सोहळेही सुरु झाले आहेत. याच लाडक्या बाप्पाला सजण्या-नटण्यासाठी आता अलंकारांवरही शेवटचा हार फिरला असून लवकरच बाप्पाच्या मूर्तीवर हे अलंकार गणेशभक्तांचे डोळ्यांचे पारणे फेडताना दिसतील. गिरगावातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ सुवर्णकार नाना वेदक यांनी घडविलेला १५ किलोंचा बाप्पाचा मुकुट यंदा लक्षवेधी ठरणार आहे.
नाना वेदक यांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासांठी एकूण ७०-८० किलोचे दागिने घडविले असून ते जवळपास ४० लाखांच्या घरात आहेत. शहर-उपनगरातील शिवडीचा राजा, अंधेरीचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, चारकोपचा राजा, विरारचा महाराजा, गिरगावचा राजा, खेतवाडीचे बाप्पा इ. मंडळांनी अलंकारांसाठी यंदा आॅडर्स दिल्याचे वेदक यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले. तर यंदा घाटकोपर येथील अल्ताफनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने १५ किलोच्या जवळपास १५ लाखांचे मुकुट घडविल्याचे नाना यांनी सांगितले. तसेच, सर्वाधिक मागणी आशीर्वादाच्या हाताला आणि सोनपावलांना असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या २५ वर्षांपासून दागिन्यांची जडणघडण करत असलेले नाना या प्रक्रियेविषयी सांगताना म्हणाले की, चांदीला सोन्याचे फॉर्मिंग करुन हे अलंकार बनविले जातात. यात केवळ चांदी नव्हे तर सोन्याचाही समावेश असतो. या अलंकारांच्या जडणघडणीचे काम मार्च - एप्रिलमहिन्यापासून सुरु होते. गणेशमूर्तींचे साचे पाहून त्याप्रमाणे अलंकार घडविले जातात. दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा आणि गणेशगल्लीच्या बाप्पाचे प्रत्येकी जवळपास १७ किलोंच्या अलंकारांच्या नूतनीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.
 
जीएसटीचा परिणाम नाही
नोटाबंदी आणि जीएसटीनंतरचा पहिलाच गणेशोत्सव असूनही अलंकारांच्या बाजारपेठेवर त्याचा तितकासा परिणाम झालेला नाही. कारण गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या सेवेखातर वस्तू सेवा कर भरुन अलंकार घडविल्याचे नाना यांनी सांगितले.
 
उंदीरमामा, गदा रवाना होणार हैदराबादला
लालबागच्या राजाचा थाट पाहून हैद्राबाद येथील एका गणेशोत्सव मंडळाने नानांकडून खास राजासारखी गदा आणि उंदीर मामा घडविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, उंदीरमामा आणि ५ किलो वजनाची जवळपास तीन लाख रुपयांची गदा तयार असून लवकरच हैद्राबादला रवाना होणार आहे.
 
बाप्पाच्या अलंकारांचा थाट
गदा ५ किलो ३ लाख
मुकुट १५ किलो १५ लाख
आशीर्वादाचा हात साडेतीन किलो दोन लाख
तोडे दीड किलो सव्वा लाख
दोन पाऊल दीड किलो सव्वा लाख
सोंडपट्टा ८०० ग्रॅम ६० हजार
छोटा आशीर्वादाचा हात ७०० ग्रॅम ५० हजार
भिकबाळी १०० ग्रॅम १० हजार

{{{{dailymotion_video_id####x845a10}}}}

 

Web Title: VIDEO - Bappa will not make lakhs of ornaments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.