शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 20:28 IST

कांद्यावरील निर्यातबंदी उठवा व १५०० रुपये हमी भाव द्या, पटोले यांची मागणी

भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी द्यावा अथवा क्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाजपा व मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे उघड झाले आहे. उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना देण्यास भाजपा सरकारकडे पैसे नाहीत. सध्या बाजारात कांद्याचे भाव घसरलेले आहेत. बाजारात कांद्याला ४०० ते ५०० दर मिळत आहे. या दरातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांद्याचे घसरलेले भाव पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ही शेतकऱ्याची क्रूर थट्टाभाजपा सरकारच्या काळात कांदा, सोयाबीन, कापूस या मालालाही भाव नाही. आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात बाजारात पडलेले भाव यात तो पुरता पिचला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ५०० किलो कांद्याला एक रुपया किलोप्रमाणे भाव मिळाला व खर्चाची वजावट करुन केवळ २ रुपयांचा धनादेश त्या शेतकऱ्याच्या हातात पडला. ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. मागील वर्षी पुणे जुल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी त्यांना पत्र पाठवून आत्महत्या केली. विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे परंतु भाजपाला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला भाजपा सरकारला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाFarmerशेतकरी