उत्तुंग इमारतींसमोर हवामान खाते झुकले!
By Admin | Updated: July 15, 2014 03:29 IST2014-07-15T03:29:44+5:302014-07-15T03:29:44+5:30
मुंबईतील हवामानाचा अंदाज घेणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा असल्याचा दावा करणाऱ्या हवामान खात्याने सोमवारी याबाबत झुकते घेतले

उत्तुंग इमारतींसमोर हवामान खाते झुकले!
अमर मोहिते, मुंबई
मुंबईतील हवामानाचा अंदाज घेणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा असल्याचा दावा करणाऱ्या हवामान खात्याने सोमवारी याबाबत झुकते घेतले. उंच इमारतींना निर्बंध घालणारी ही अटच मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले़
तसेच मुंबईजवळ अजून एक डॉप्लर बसवणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे़ त्याची नोंद करून घेत न्या़ अनुप मोहता यांच्या खंडपीठाने महापालिकेला उत्तुंग इमारतींच्या प्रकल्पांबाबत नियमानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले़ त्यामुळे उत्तुंग इमारतींमधील डॉप्लरचा अडथळा दूर झाला असून, याचे प्रकल्प आता
मार्गी लागतील़
बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देश हवामान खात्याला दिले होते़ तसेच डॉल्परला उंच इमारतींचा नेमका अडथळा काय असून संबंधित विभागात उंच इमारती असताना हे यंत्र कसे बसवण्यात आले व हे यंत्र आता तेथून हलवणार की नाही याचा खुलासा हवामान खात्याने करावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते़ त्यानुसार हवामान खात्याने ही अटच मागे घेतली जात असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले़