शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

तिकीट तपासनीसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला, अल्पवयीन युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 7:50 PM

बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या  एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न  कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला.

डोंबिवली, दि. 22 -  बांद्रा येथील एका उच्यभ्रू वसाहतीत राहणाऱ्या  एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न  कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला.वरिष्ठ तिकीट तपासनीस एल.डी.सावंत आणि सुनील सांबरे असे त्या दोघांचे नाव असून त्यांनी अल्पवयीन असल्याचे मंगळवारी निदर्शनास येताच अत्यत सावधपणे मुलीच्या पालकांशी सम्पर्क साधला. सावंत यांनी लोकमतला सांगितले की, एक मुलगी आणि एक मुलगा साधारण वय 15 वर्षे असेल, ते दोघे जण सकाळी कल्याण स्थानकात पुष्पक एक्स्प्रेसने जाण्यासाठी सावंत याना भेटले. त्यावर त्या दोघांनी त्या गाडीने यूपीला जायचे असून साध तिकिट कन्फर्म करून द्या असे सांगितले. त्यावर संशय येताच सावंत यांनी तातडीने सांबरे यांना घटना सांगितली. सांबरे यांनीही बांद्रा स्थानदरम्यान युवती मिसिंग असल्याची तक्रार असल्याचे सांगताच दोघांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सम्पर्क साधला. त्यावर मुलीचा फोटो मॅच होत असून पालकांना त्यासंदर्भात माहिती दिली. पालक सावंत यांच्याशी बोलले, घडला प्रकार समजून घेत ते दोघे पळून जात असल्याची माहिती पक्की झाली. त्यानुसार सावंत यांनी वेळकाढू पणा करत पुष्पक मध्ये जागा नसून दुसऱ्या गाडीत बसवतो थोडा वेळ द्या असे सांगितले. तसेच कल्याण स्थानकातील अरपीएफला माहिती दिली. काही वेळाने त्या मुलीचे पालक आले, त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतर सावंत आणि सांबरे यांनी त्या युवतीला अरपीएफच्या सहाय्याने पालकांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे दोघा तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. म्हणून मुलीच्या पालकांनी विशेष रक्कम बक्षीस म्हणून त्यांना देऊ केली असता सावंत यांनी ती नाकारली. मुलीचा सांभाळ नीट करा, मुलीचीही समजूत घालत असं पुन्हा करू नको असे समजावले. या घटनेमुळे सावंत आणि सांबरे यांचे मध्य रेल्वेच्या मुबंई विभागात कौतुक होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाIndian Railwayभारतीय रेल्वे