पुण्यातील तीन तरुणांचे ‘मिशन ईशान्य’
By Admin | Updated: July 27, 2014 01:36 IST2014-07-27T01:36:58+5:302014-07-27T01:36:58+5:30
प्रत्यक्षात काम करण्याची इच्छा असणा:या पुण्यातील तीन तरुणांची पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज्साठी (पीएमआरडीएफ) निवड झाली आहे.

पुण्यातील तीन तरुणांचे ‘मिशन ईशान्य’
राहुल कलाल - पुणो
वय अवघे बावीस ते पंचवीस. महाविद्यालयाचे शिक्षण घेत मौजमजा करण्याचे वय.. पण या वयात देशाच्या समस्या जाणून घेत त्यावर प्रत्यक्षात काम करण्याची इच्छा असणा:या पुण्यातील तीन तरुणांची पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज्साठी (पीएमआरडीएफ) निवड झाली आहे. यासाठी असणारी अवघड परीक्षा देऊन आता हे तिघे ईशान्य भारताच्या मिशनवर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत विकासात मागे राहिलेल्या आसाम, त्रिपुरा राज्यांतील ग्रामीण नागरिकांचा विकास साधण्याचे काम हे तिघे पुढील दोन वष्रे करणार आहेत.
मृणाल देशमुख, ऋत्विक फाटक, पीयूष ओझर्डे अशी या तरुण पुणोकरांची नावे आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रलयाने 2क्12मध्ये पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज् ही अनोखी संकल्पना मांडली आणि ती राबविण्यास सुरुवात केली. स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर अवघड अशी प्रवेश परीक्षा घेऊन देशभरातील हजारो युवकांमधून 16क् जणांची निवड केली जाते. 2क्14च्या बॅचसाठी पुण्यातील या तिघांची निवड झाली आहे. या फेलोज्ना आयएएस अधिका:यांच्या समतुलनेत अधिकार देण्यात आले आहेत.
ऋत्विक हा 22 वर्षाचा असून, त्याने नुकतेच शिलाँगमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. पीयूष हा 23 वर्षाचा असून, त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तर मृणाल हा 25 वर्षाचा असून, त्याने अभियांत्रिकीचे आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. नोव्हेंबर 2क्13मध्ये त्यांनी पीएमआरडीएफची प्रवेश परीक्षा दिली आणि त्यात त्यांना यश मिळाले. नुकतेच त्यांचे यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
या वर्षी पीएमआरडीएफमध्ये ईशान्य भारताचा समावेश करण्यात आला आहे. देशाच्या इतर भागांच्या समस्या आणि ईशान्य भागातील समस्या वेगळ्या असल्याने या तिघांनी ईशान्य भारतात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाम राज्याच्या जोरहाट जिल्ह्यात मृणाल तर हायलाखंदी जिल्ह्यात ऋत्विक काम करणार आहे. पीयूष हा त्रिपुरा राज्यातील सर्वात मागास असलेल्या धलाई जिल्ह्यात काम करणार आहे.
याबाबत मृणाल म्हणाला, सरकारी योजना राबविण्यासाठी सरकारी यंत्रणा आहे. पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात तळागाळार्पयत या योजना पोहोचत नाहीत किंवा तेथील समस्या या सरकारी यंत्रणा जाणून घेत नाहीत. त्यामुळे पीएमआरडीएफ हा प्रकल्प केंद्राने सुरू केला. यामध्ये प्रत्यक्षात दोन वष्रे आम्ही ग्रामीण भागात तळागाळातील लोकांबरोबर राहून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी स्थानिक योजना निर्माण करणो, हे आमचे काम असेल.
ऋत्विक म्हणाला, या प्रकल्पात काम करताना आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. कोणतीही योजना केंद्राकडून आमच्याकडे येणार नाही आणि आम्हाला कोणतीही योजना काटेकोरपणो राबविण्याचे बंधन नाही. जिल्हाधिका:यांकडेच आमचे रिपर्ो्िटग असणार आहे.
पीयूष म्हणाला, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना ईशान्य भारतात अभ्यास दौ:यांच्या निमित्ताने जाऊन आलो. तेथे काम करण्याची संधी पीएमआरडीएफच्या माध्यमातून मिळणार असल्याने ती मी स्वीकारली.
ईशान्य राज्यांच्या ग्रामीण भागातील समस्या खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या समजावून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.
- मृणाल देशमुख
सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्या मधली फळी म्हणजेच डेव्हलपमेंट प्रोफेशनर्स असे आमचे काम असणार आहे.
- ऋत्विक फाटक
ग्रामीण लोकांच्या समस्या समजावून घेणो, जिल्ह्याचा आढावा घेणो, विविध योजना कशा चालतात हे पाहणो आणि प्रत्यक्षात त्यांची गरज काय आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी काही प्रकल्प राबविणो, हे काम आम्ही करणार आहोत.
- पीयूष ओझर्डे
च्देशाच्या इतर भागांच्या समस्या आणि ईशान्य भागातील समस्या वेगळ्या असल्याने या तिघांनी ईशान्य भारतात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. च्आसामच्या जोरहाट जिल्ह्यात मृणाल तर हायलाखंदी जिल्ह्यात ऋत्विक काम करणार आहे. पीयूषने त्रिपुरातील धलाई जिल्ह्याची निवड केलेय.