भट्टीच्या स्फोटात तीन कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 06:32 IST2018-05-31T06:32:03+5:302018-05-31T06:32:03+5:30

तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीतील तोरणे इस्पात या लोखंड निर्मिती करणाऱ्या कंपनीत बुधवारी सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट होऊन तीन कामगारांचा भाजून जागीच मृत्यू झाला

Three workers killed in a blast in the explosion | भट्टीच्या स्फोटात तीन कामगार ठार

भट्टीच्या स्फोटात तीन कामगार ठार

वाडा : तालुक्यातील तोरणे या गावाच्या हद्दीतील तोरणे इस्पात या लोखंड निर्मिती करणाऱ्या कंपनीत बुधवारी सायंकाळच्या सुमारास भट्टीमध्ये स्फोट होऊन तीन कामगारांचा भाजून जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
नीलेश यादव (२८), संजय गुप्ता (२७), सनी वर्मा (२८) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर विनोद यादव (३५) हा कामगार गंभीर जखमी आहे. कंपनीत लोखंडाच्या कच्चा माल (स्कॅ्रप) वितळवून लोखंडी रॉड तयार केले जातात. यासाठी भट्टी अतिउच्च तापमानावर गरम केली जाते. बुधवारी सायंकाळी रॉड तयार करण्याचे काम सुरू असतानाच भट्टी लिकेज होऊन भयंकर स्फोट झाला.

लोखंडाचा तप्त रस कामगारांच्या अंगावर पडल्याने ते गंभीररीत्या भाजले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Three workers killed in a blast in the explosion