नोकरीचे अमिष दाखवून अहमदनगरच्या महिलेवर तिघांनी केला बलात्कार

By Admin | Updated: October 21, 2016 17:17 IST2016-10-21T17:17:57+5:302016-10-21T17:17:57+5:30

नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहित महिलेस नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापूर, गाणगापूर, सोलापूरात नेऊन ठिकठिकाणी तिघांजणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना

Three women raped by Ahmadnagar woman | नोकरीचे अमिष दाखवून अहमदनगरच्या महिलेवर तिघांनी केला बलात्कार

नोकरीचे अमिष दाखवून अहमदनगरच्या महिलेवर तिघांनी केला बलात्कार

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ : नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहित महिलेस नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापूर, गाणगापूर, सोलापूरात नेऊन ठिकठिकाणी तिघांजणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात उघडकीस आली़ पिडीत महिला ही शेळगाव. (ता. श्रीगोंदा.जि. अहमदनगर) येथील आहे. या महिलेचे वय ३५ आहे़ याप्रकरणी पिडीत महिलेने लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

पैगबर उर्फ सय्यद दगडू शेख (वय ४०), चंद्रकात महादेव स्वामी (वय ३१. सुलतानपूर.ता.अक्कलकोट), आप्पासाहेब दत्तू तोडकर (रा.नान्नज.ता.उत्तर सोलापूर) अशी बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या तिघांना शुक्रवारी सोलापूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले आहे़

दरम्यान, ११ आॅक्टोबर २०१६ रोजी पिडीत महिलेचे स्वत:च्या पतीबरोबर भांडण झाले होते़ त्यामुळे पिडीत महिलेने रागाच्या भरात घर सोडले होते़ कुठे जावे़ क़ाय करावे या प्रश्नांची उत्तरे शोधत ती महिला पुण्याला जाण्यासाठी अखेर दौंड रेल्वे स्टेशन गाठले़ मात्र तेथुन कुठे जावे या व्दिदा मनस्थितीत असलेल्या महिलेने सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेत बसून प्रवास केला़ इथे काही तरी काम मिळेल या आशाने त्या महिलेने सोलापूर रेल्वे स्थानकावरच उतरणे पसंत केले़ यावेळी आरोपी चंद्रकांत स्वामी याने नोकरीचे आमिष दाखवून तिला पुण्याला जावू असे सांगितले़ नोकरीच्या निमित्ताने आरोपी स्वामी याने त्या पिडीत महिलेस पुणे, कोल्हापूर, गाणगापूर असे शहरे फिरविली मात्र काम काय मिळवून दिले नाही़ उलट त्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला़ यानंतर आरोपी स्वामी याने तिला सोलापूरात आणून आरोपी पैगबंर शेख यांची ओळख करुन देवून त्याच्याकडे काम देण्याचे आमिष दाखवुन तिला त्याच्या सोबत जाण्यास भाग पाडले.

मात्र सय्यद यानेही तिला काम देतो असे आमिष दाखवूृन सोलापूर रेल्वे स्टेशन व त्याचा मित्र आरोपी आप्पासाहेब यांच्या दुचाकीवर बसवून पाकणी येथे आणून तिच्या अत्याचार केला. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरूच होते़

Web Title: Three women raped by Ahmadnagar woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.