शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीन चिन्हे सुचविलेली, निवडणूक आयोगाने वेगळेच चिन्ह दिले; शरद पवार गटाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 13:42 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे. 

राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार  गटाला वेगळे नाव देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव असून चिन्हासाठी पवार गटाने अर्ज केला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे. 

निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने तीन चिन्हे सुचविली होती. त्यातले त्यात शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही होते. परंतु आयोगाने शरद पवार गटाला म्हणजे त्यांच्या नव्या पक्षाला  ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे. हे चिन्ह शरद पवार गटाने सुचविलेले नव्हते असा दावा माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी "तुतारी" हे चिन्ह दिले, असे असे आव्हाड ट्विटद्वारे म्हणाले आहेत. यावर आव्हाड यांनी टीका केलेली नसून सकारात्मक मत मांडले आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत 'तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका' असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना "तुतारी" हे चिन्ह देऊन दिला आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालीच नसल्याचा दावा करत शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास अजित पवार गटाने केलेल्या विरोधावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. तसेच तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत, शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग