पेठजवळील अपघातात तीन ठार
By Admin | Updated: May 30, 2016 22:18 IST2016-05-30T22:18:05+5:302016-05-30T22:18:05+5:30
नाशिक -धरमपूर महामार्गावर पेठ शहरापासून ११ कि मी अंतरावर नालशेत गावाजवळ ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालकांसह एक क्लिनर असे तीन जन जागीच ठार झाले.

पेठजवळील अपघातात तीन ठार
>ऑनलाइन लोकमत
पेठ, दि. ३० - नाशिक -धरमपूर महामार्गावर पेठ शहरापासून ११ कि मी अंतरावर नालशेत गावाजवळ ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालकांसह एक क्लिनर असे तीन जन जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून येणारा टँकर व नाशिकहून गुजरातकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरा समोर धडक झाली यात टँकरचालक गणेश छोद्राराम पाटील, ट्रकचालक दिलीप महादेव कायंदे तर क्लिनर दत्ता मारुती चित्रामपल्ली हे तिघे जागीच ठार झाले.
पेठ पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने एकमेकात अडकलेली वाहने काढून मृतदेह बाहेर काढले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.