मानखुर्दमध्ये शौचालयाचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: February 3, 2017 11:49 IST2017-02-03T10:32:45+5:302017-02-03T11:49:36+5:30

सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Three killed in mausoleum slab in Mankhurd | मानखुर्दमध्ये शौचालयाचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

मानखुर्दमध्ये शौचालयाचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरातील ही घटना आहे.
 
हरिश पटेदार (वय 40 वर्षे) आणि गणेश सोनी (वय 45 वर्षे) अशी दोन मृतांची नावे आहेत. तिस-या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
डीसीपी अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
 
 या घटनेवरुन शौचालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, शौचालय धोकादायक स्थितीत आल्याची तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांनी केला आहे.  
 

Web Title: Three killed in mausoleum slab in Mankhurd