भांडुप, ताडदेवमधील अपघातात तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: May 13, 2017 02:50 IST2017-05-13T02:50:35+5:302017-05-13T02:50:35+5:30

भांडुप आणि ताडदेवमध्ये गुरुवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे.

Three deaths in Bhandup, Taddev collapse | भांडुप, ताडदेवमधील अपघातात तिघांचा मृत्यू

भांडुप, ताडदेवमधील अपघातात तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडुप आणि ताडदेवमध्ये गुरुवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे. भांडुप मद्रास कॅफे परिसरात गुरुवारी सकाळी खासगी टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल बसचा क्लीनर मोहम्मद केजू रियाज खान चालकाला वळण घेण्यासाठी मार्गदर्शन करत असताना ठाणे येथून भरधाव आलेल्या टेम्पोची धडक बसल्याने खानचा मृत्यू झाला.
दुसरी घटना भांडुप तुलशेतपाडा येथे सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. एक तरुण टेम्पो चालविण्याचे नाटक करत असताना एक्सलेटरवर पाय पडल्याने गाडी इब्राहिम अहमद या तरुणाला धडक देऊन पुढे गेली. यात इब्राहिमचा मृत्यू झाला. तर गुरुवारी रात्री ताडदेव येथून मालाडच्या दिशेने बडी की रातसाठी जाणाऱ्या भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार मोहसीन मोहम्मद मुस्लीम शेख (३०) याचा मृत्यू झाला.

Web Title: Three deaths in Bhandup, Taddev collapse