शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:25 AM

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे

नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ पकडले़एसीबीचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला डांबर प्रकल्पाचे मालक मोहिते हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी २८ टक्के कमी दराची निविदा भरली होती़ त्यांना कंत्राट मिळाले व त्यांनी कामही पूर्ण केले़कामाचे अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहितेंना पैसे अदा करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी सहा लाखांची मागणी केली होती़ मोहिते यांनीनाशिकच्या एसीबीकडे तक्रार केली होती़अधिकाºयांनी शुक्रवारी सापळा रचला़ तीन अभियंत्यांनी मोहितेंकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांचे मूळ चलन व १ लाख रुपयांचे नकली चलन ) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून कार्यालयात स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ देशपांडे यांनी ही रक्कम देवेंद्र पवार व सचिन पाटील यांच्या निदेशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़ त्यानंतर पवार व पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांच्याही मालमत्तेची चौकशी सुरू होती़

टॅग्स :jailतुरुंगCorruptionभ्रष्टाचारNashikनाशिक