शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

By Admin | Updated: July 22, 2016 21:41 IST2016-07-22T21:41:57+5:302016-07-22T21:41:57+5:30

शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील उर्फ अतुल टेके ,(२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपीचे नाव आहेत.

Three arrested in Sivadi firing | शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 -  शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील उर्फ अतुल टेके (२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपीचे नाव आहेत.
पैशांच्या वादातून बुधवारी रात्री सुशांत उर्फ बंटी घोडेकरची या त्रिकुटाने हत्या केली. चौघेही एकाच परिसरात राहण्यास होते. कॉटनग्रीन परिसरात उभ्या असलेल्या वाहन चालकांकडून ही टोळी पैसे उकळत होती. हाच पैशांचा वाद मिटविण्यासाठी बुधवारी या त्रिकुटाने बंटीला भेटण्यासाठी बारमध्ये बोलाविले. दारु पीत असताना सुशांतसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. त्रिकुटाने त्याला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत बाहेर मदतीसाठी याचना करणा-या बंटीवर अखिलेशने तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिघांनीही पळ काढला. शुक्रवारी हे तिघेही परदेशात निघून जाण्याच्या तयारीत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून या त्रिकुटाला मुलुंड परिसरातून अटक केली. तिघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात खून,जबरी चोरी, मारहाणी सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

Web Title: Three arrested in Sivadi firing