शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘सात-आठ वाजल्यानंतरच्या बैठका कमी करा, म्हणजे धमक्या येणं कमी होईल’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 16:05 IST

Threats to Aditya Thackeray: भाजपा आमदार Nitesh Rane यांनी Aditya Thackeray यांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. तसेच धमक्या येऊ नयेत म्हणून आदित्य ठाकरे यांना खोचक सल्लाही दिला. 

मुंबई - राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजला. दरम्यान, आदित्य ठाकरेंना आलेली धमकी ही कर्नाटकमधून आल्याने त्याच्याशी तेथील सत्ताधारी असलेल्या भाजपाचा संबंध जोडून सत्ताधारी गट सभागृहात आक्रमक झाला होता. दरम्यान, आजच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. तसेच धमक्या येऊ नयेत म्हणून आदित्य ठाकरे यांना खोचक सल्लाही दिला. 

नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी दिली हे विचारा. धमकी देण्यासारखी आदित्य ठाकरे नेमकी कृती करतात काय? त्यांनी सात आणि आठ वाजल्यानंतरच्या बैठका कमी कराव्यात, म्हणजे धमक्या कमी होतील, असा टोला नितेश राणेंनी लगावला.दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या विधिमंडळातील अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी सांगितले की, ते आजारी आहेत, असं आम्ही ऐकलंय. ते लवकर बरे व्हावेत, अशी आमची प्रार्थना आहे. मात्र त्यांना जर काम करायला जमत नसेल तर त्यांनी जबाबदारी कुणा अन्य मंत्र्याकडे द्यावी किंवा राजीनामा द्यावा. मात्र सध्या त्यांच्या कुणावर विश्वास नाही असं दिसतंय, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

यावेळी नितेश राणेंनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही डिवचले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, पहिलं शिवसेनेनं ठरवावं की ते हिंदुत्वाच्या बाजूने आहेत की, ते सेक्युलॅरिझमच्या बाजूने आहेत. कधी त्यांना सेक्युलॅरिझम पाहिजे असतो. कधी त्यांना धर्मनिरपेक्ष बनायचं असतं. तर कधी ते हिंदुत्वाच्या मागे जातात. अशा दोन्ही बाजूला लटकणाऱ्या लोकांना, मधल्या लोकांना  समाजात काय म्हणतात याबाबत जरा विचार करा. शिवसेनेची भूमिका नेमकी कोणती याबाबत शिवसेनेनं, सामनाने भूमिका स्पष्ट करावी. बाकी मधले असतील तर त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, असा टोला नितेश राणेंनी लगावला.

यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या झेंडा घेऊन उभे आहोत, या शिवसेनेच्या विधानावरूनही नितेश राणेंनी टोला लगावला. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे विधान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तोंडावर जाऊन म्हणावं. जेव्हा शिवसेना असं विधान राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या समोर म्हणून दाखवेल, तेव्हा आम्ही त्यांना मानू. बाकी सामनाच्या ऑफिसमधलं हिंदुत्व आम्हाला नको आहे, असेही नितेश राणे म्हणाले.   

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा