मोदी सरकारमुळे सहिष्णुतेला धोका
By Admin | Updated: July 27, 2014 01:43 IST2014-07-27T01:43:16+5:302014-07-27T01:43:16+5:30
खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले.

मोदी सरकारमुळे सहिष्णुतेला धोका
औरंगाबाद : खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले. या सरकारमुळे देशातील बंधुभाव, सहिष्णुतेला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता राज्यात त्यांना थारा देणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मोदी सरकारवर केला.
काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री डी. पी. सावंत, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, खा. रजनी पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभेचा निकाल अनपेक्षित होता. आम्ही परंपरागतपणो लढलो व त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्याविरुद्ध नकारात्मक प्रचार केला. परंतु पहिल्या 5क् दिवसांत लोकांना चूक उमगली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत सत्तेवर आलेल्या सरकारने सर्वच क्षेत्रंत महागाई करून जनतेला फसविले आहे. देशाचे विघटन करणा:या प्रवृत्तीला वेळीच रोखा, असे आवाहन मोहन प्रकाश यांनी केले. सत्तेवर येताच 1क्क् दिवसांत महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन मतदारांना भूलथापा देणा:या मोदी सरकारने प्रचारात देशी-विदेशी कंपन्या व उद्योगपतींना उतरविले होते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केला.
लोकसभेच्या वेळची लाट आता ओसरेल, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला, तर कारगील विजयी दिनानिमित्त कारगील शहिदांना अभिवादन करून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, 574 सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय आम्हाला मिळवून दिला. देशाची एकात्मता, बंधुभाव टिकणार की नाही, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
या वेळी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण, दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राज्यमंत्री अमित देशमुख यांचीही भाषणो झाली. (प्रतिनिधी)