शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो एसटी कर्मचारी मतदानाला मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:40 IST

सेवेमुळे मतदारसंघाबाहेर : निवडणूक आयोग दखल घेणार का?

- चेतन ननावरेमुंबई : एसटी महामंडळातील हजारो चालक व वाहक मतदानादिवशीही कर्तव्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असतात. परिणामी, संबंधित कर्मचाºयांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असून यामध्ये निवडणूक आयोगाने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे. त्यावर एसटी कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाला य़ोग्य तो मार्ग काढण्याचे आवाहन करू, अशी प्रतिक्रिया मुंबई शहराचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केली आहे.

एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, निवडणूक कामानिमित्तही एसटी कर्मचाºयांना मतदानाच्या चार दिवसआधी कळवले जाते. त्यामुळे बहुतेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहतात. याशिवाय लाखो प्रवाशांना सेवा देण्यासाठी हजारो चालक व वाहक मतदानादिनी एसटीच्या फेºया घेऊन जिल्ह्याबाहेर असतात. रात्री उशीरा किंवा पहाटे निघालेले कर्मचारी दुसºया दिवशी घरी परतात. परिणामी, त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. याउलट मतदान यंत्रापासून निवडणूक कामासाठी असलेल्या कर्मचाºयांची वाहतूक करण्याचे कामही बहुतेक चालक व वाहकांना करावे लागते. संबंधित कर्मचाºयांनाही कामामुळे मतदान करता येत नाही. या सर्व चालक व वाहकांसाठी निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवण्याची गरजही रेडकर यांनी व्यक्त केली.

एसटी कर्मचाºयांचे मुख्यालय मुंबईत असल्याने नक्कीच या बाबत निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच एसटी कर्मचाºयांना मतदानादिनी त्याच विभागातील सेवा देण्यासंदर्भात आयोगासह एसटी महामंडळाला कळवण्यात येईल, असेही जोंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक