ठामपाच्या महासभेत शिवसेना - राष्ट्रवादी नगरसेवकांत धक्काबुक्की

By Admin | Updated: November 21, 2014 02:34 IST2014-11-21T02:34:02+5:302014-11-21T02:34:02+5:30

: पालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा, डेंग्यूचा वाढता फैलाव आदींसह विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय असताना त्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गु

Thousands of Shiv Sena-NCP corporators shouted slogans | ठामपाच्या महासभेत शिवसेना - राष्ट्रवादी नगरसेवकांत धक्काबुक्की

ठामपाच्या महासभेत शिवसेना - राष्ट्रवादी नगरसेवकांत धक्काबुक्की

ठाणे : पालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा, डेंग्यूचा वाढता फैलाव आदींसह विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय असताना त्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गुरुवारच्या महासभेत जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले.
या विषयावर एक तास सभा तहकूब करण्याऐवजी या घटनेचा निषेध म्हणून सभा पूर्णवेळ तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी डायसवरच महापौरांना घेरले. या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळाले.
पालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडण्यात आणि शहरात डेंग्यूवर आळा बसविण्यात सत्ताधारी कमी पडल्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी अंत्ययात्रा काढली. परंतु, तोपर्यंत महासभा सुरू होऊन सुरुवातीला प्रश्नोत्तरे घेण्याऐवजी महापौर संजय मोरे यांनी जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ सभा तहकुबीला प्राधान्य दिले. चर्चा करण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली होती. परंतु, आंदोलनकर्ते सभागृहात घुसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सभा एक तासासाठी तहकूब केली. त्यानंतर, पुन्हा सभा सुरू होताच विरोधकांनी त्याच मुद्द्याला हात घालून सभाशास्त्रानुसार महापौर सभा चालवत नसल्याचा आरोप करून संपूर्ण वेळ सभा तहकूब करण्याच्या मागणीवर अडून बसले. विरोधक शांत होत नसल्याने महापौरांनी जेवणाची सुटी जाहीर केली.
या सुटीनंतर सत्ताधाऱ्यांनी सभा तहकुबीला बगल देऊन प्रश्नोत्तराला सुरुवात केली. सचिवांनी विषय वाचण्यास सुरुवात करताच काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी डायसवर धाव घेऊन त्यांच्याकडील विषयपत्रिका खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकही डायसवर धावून गेले. सत्ताधारी येताच डायसवर एकच गोंधळ उडाला. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांची शिवसेनेचे नगरसेवक संभाजी पंडित आणि बालाजी काकडे यांच्याशी जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of Shiv Sena-NCP corporators shouted slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.