शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात हजारो विस्थापित

By admin | Updated: April 15, 2017 01:37 IST

मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.

मुंबई : मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पबाधितांचे जीवन रूळावर आणण्यात येणार आहे.गारगाई प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात वाडा येथील वैतरणा नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. तर जवाहर येथील पिंजाळ नदीवर पिंजाळ धरण उभे राहणार आहे. मात्र या प्रकल्पाची वाट मोकळी करण्यासाठी महापालिकेला आधी येथील विस्थापितांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे लागणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आराखडा ठेवला आहे. त्यानुसार गारगाई धरण प्रकल्पामुळे सहा गावांतील १९१ कुटुंब तर पिंजाळ प्रकल्पात ११ गावांतील ८६५ कुटुंब विस्थापित होणार आहेत. गारगाई प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५६ कोटी तर पिंजाळ प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी २४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स आहे.- गारगाई प्रकल्पातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लीटर्स प्रती दिन आणि पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लीटर्सने दररोजचा जलसाठा वाढणार आहे.- गारगाई प्रकल्पात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५४ कोटी आणि पिंजाळ प्रकल्पात २४६ कोटी बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाठी खर्च केले जाणार आहेत.- या गावांबरोबरच ७५० हेक्टर्स तानसा वन जीवनही विस्थापित होणार आहे.- वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येथे आहे.- या प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये महापालिका मोजणार आहे.