शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अशांनाच म्हणतात खाल्ल्या ताटात घाण करणारे; आशिष शेलारांनी ट्विटरवरून शिवसेनेला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 6:34 PM

मुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

ठळक मुद्देमुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे.नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

मुंबई- मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. मुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

शिवसेनेने भाजपा सरकारविरोधात आक्रमक होत आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. शनिवारी सकाळापासून मुंबईत ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, निलम गोर्हे, किशोरी पेडणेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला. नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय'', अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून देण्यात आली. ''एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला'', अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी अक्षरशः टोक गाठल्याचे यावेळी पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या आंदोलनावर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवरही बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात. तो दिर्घायुषी होतो, असं म्हणतात. पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही टीका केली आहे. एकही निवडणूक लढवण्याची औकात नाही, अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीवर बोलू नये. कुणाच्या पायर्‍या चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. 

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या टीकेवर अनिल परब यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे, त्याच्या पायऱ्या धुवायची आणि चाटायची माझी तयारी आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो. आम्ही आजपर्यंत कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही’, असं परब यांनी म्हटलं आहे. ‘आशिष शेलार हे मातोश्रीच्या पायऱ्या चाटत चाटत आले आहेत. २०१४ मधील निवडणुकीपूर्वी शेलार तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये, असं म्हणत अनिल परब यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा