शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो ; अजित पवार यांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 1:14 PM

सध्या शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते सरकारमध्ये असून त्यांचे राज्यात आणि केंद्रात मंत्री आहेत...

ठळक मुद्देपुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न गुरुजन गौरव सोहळा

पुणे : पीक विमा कंपन्यांच्या कार्यलयांवर शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी राज्यभर मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. संबंधितांनी बोलवून काम करून घेण्याऐवजी सत्तेत राहणारे मोर्चा काढत आहेत. हे त्यांचे काम नाही अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.पुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न गुरुजन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लेखक डॉ.अनिल अवचट आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.ते यावेळी म्हणाले की, अधिवेशनाच्या काळात दुष्काळाच्या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची भाषणे बघितली तर ती आमची मागणी होती हे लक्षात येईल. पीकविमा काढताना फक्त विमा कंपन्यांचा फायदा मिळतो. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही. सध्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. ते सरकारमध्ये आहात, राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री आहेत. सरकार चालवणाऱ्यांनी मोर्चा न काढता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून, सूचना देऊन कार्यवाही करायची असते. सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, हे त्यांचं काम नाही. शिवसेना कुठेतरी कमी पडत आहेत. त्यांना प्रशासनावर वकुब ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा शिवसेना केविलवाणा प्रयत्न आहे.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारCrop Insuranceपीक विमाGovernmentसरकार