‘त्या’ बसेस विनापरवाना!

By Admin | Updated: January 31, 2015 05:14 IST2015-01-31T05:14:17+5:302015-01-31T05:14:17+5:30

पोलिसांनी जप्त केलेल्या दोन स्कूलबसेसच्या कागदपत्रांसंदर्भात उपविभागीय परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली

'Those' buses are unlawful! | ‘त्या’ बसेस विनापरवाना!

‘त्या’ बसेस विनापरवाना!

बल्लारपूर (जि़ चंद्रपूर) : पोलिसांनी जप्त केलेल्या दोन स्कूलबसेसच्या कागदपत्रांसंदर्भात उपविभागीय परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बसेसची कुठेही नोंदणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या जिल्ह्यात वाहन चालवायचे आहे तेथील आरटीओंची परवानगी घेणे गरजेचे असतानाही येथे कुठलीही परवानगी न घेताच स्कूलबस चालत असल्याचा गंभीर प्रकार आता उघड झाला आहे. विशेष म्हणजे एकाच क्रमांकाची बस बल्लारपूर आणि गोंदियात चालत असल्याने पुढील चौकशीसाठी बल्लारपूर पोलिसांचे पथक गोंदियाला रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Those' buses are unlawful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.