शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या त्या १२ निलंबित आमदारांना मतदान करता येणार, निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:08 IST

Maharashtra Rajya Sabha Election: या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का,  असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

मुंबई - काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यसभेच्या या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का,  असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. (Those 12 suspended BJP MLAs will be able to vote for the Rajya Sabha elections, the Election Commission has given a big decision)निवडणूक आयोगाने भाजपाच्या या १२ निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. या १२ निलंबित आमदारांना विधान भवनात प्रवेश करण्यास मनाई असल्याने त्यांच्यासाठी विधान भवनाच्या आवारात स्वतंत्र मतदान केंद्र उभारले जाईल. या आमदारांसाठी स्वतंत्र मतपेटी आणि मतपत्रिका असतील, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी चार या वेळेत या निलंबित आमदारांना मतदान करता येईल. त्यांच्या मतपत्रिका नंतर मुख्य मतदान केंद्रातील मतपत्रिकांमध्ये मिसळल्या जातील. दरम्यान, राज्यसभेच्या या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यावर लगेच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान,  काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. २०१७ मध्ये ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने हिंदी भाषक चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र