शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:36 IST

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत.

Sanjay Raut : (Marathi News) मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड्स हे निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. तसेच, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भाजपा आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी चिपळूण येथे झालेल्या राड्यावरून केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. इलेक्टोरल बॉण्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे आणि ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स घेऊन भाजपाची तिजोरी भरली आहे. त्यांची नावे जाहीर करा, ही सूचना किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात गौतम अदानींचे नाव सर्वात प्रथम आहे, मला खात्री आहे. अशा प्रकारचे आपल्या उद्योगपतींना ठेके द्यायचे आणि त्या बदल्या शेकडो कोटीचे इलेक्टोरल बॉण्ड्स निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपाच्या तिजोरीत आज जमा झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

उद्योगपती गौतम अदानी यांना वांद्रेतील एमएसआरडीची जागा मिळणार आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मिठागराची जमीन अडाणींना, धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे. मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणीनगर केले तर १०६ हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिले आहे. त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल. काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वरक्षक काय करताय? कोल्हापुरात बसून, अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय. हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहे. न्यायालयाने जो काल निकाल दिलेला आहे. तो भाजपाचा मुखवटा फाडणारा आहे. त्यात जे नावे जाहीर होतील ते बघाच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

"महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसतेय"काल चिपळूण येथे भाजपा आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यावरून संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपाने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैतिकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपाने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे. आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपाने जो दारूखाना सुरु केला आहे. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपाच पूर्णपणे जबाबदार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा