शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘काकां’वरच्या नाराजीचा तिसऱ्यांदा झाला स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:49 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

- सुकृत करंदीकरपुणे : सन २००४, सन २००९, सन २०१९ यातल्या प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर नाराज होण्याची वेळ ओढवली. ही वेळ दुसºया कोणामुळे नव्हे तर ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून स्वत:च्या मुलाला पार्थला पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी अजित पवारांना मिन्नतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या. पंधरा वर्षे अनेक निवडणुकांची शेकडो तिकीटे वाटणाऱ्या अजित पवारांना ही गोष्ट फार लागली होती. ‘काका’ आपल्याला डावलतात, अशी भावना त्यांच्या मनात येण्याची ही पहिली वेळ नाही.२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ तर काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचारयंत्रणा राबवण्यापर्यंत अजित पवारांनी मोठा पुढाकार घेतला होता. स्वाभाविकपणे पक्षात अजित पवारांना मानणाऱ्या आमदारांची संख्या अर्थातच जास्त होती.काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्याने आपल्या रुपाने ‘राष्ट्रवादी’ने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगावा, हा अजित पवार यांचा आग्रह होता. मात्र शरद पवारांनी तसे घडू दिले नाही. राज्यात आणि केंद्रात जास्तीची मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याचा निर्णय त्यांनी केला. काँग्रेस पूर्णत: ‘बॅकफूट’वर असतानाही हाती येणारे मुख्यमंत्रिपद निसटल्याने अजित पवार पहिल्यांदा काकांवर नाराज झाले होते.२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यावेळी अजित पवारांना काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात रस नव्हता. भाजप-शिवसेना या पक्षातील आमदार फोडून राष्ट्रवादीचे सरकार आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली होती. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या ते संपर्कात होते. सिमल्याला मुंडे-अजितदादांची भेट झाल्याची खमंग चर्चा त्यावेळी रंगली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस