खंडाळा घाटातील तिसरी लेन खुली

By Admin | Updated: June 5, 2016 01:09 IST2016-06-05T01:09:27+5:302016-06-05T01:09:27+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरची खंडाळा घाटातील मागील वर्षभरापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली तिसरी लेन शनिवारपासून सुरू करण्यात आली. आडोशी बोगद्याजवळील डोंगराला सुरक्षा

The third lane of the Khandala gorge open | खंडाळा घाटातील तिसरी लेन खुली

खंडाळा घाटातील तिसरी लेन खुली

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरची खंडाळा घाटातील मागील वर्षभरापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली तिसरी
लेन शनिवारपासून सुरू करण्यात आली. आडोशी बोगद्याजवळील डोंगराला सुरक्षा जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाल्याने येत्या दोन
दिवसांत त्या भागात बंद असलेली तिसरी लेनदेखील सुरू करण्यात येणार आहे.
मागील वर्षी २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पहिली दरड कोसळली होती. त्यानंतर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा व आडोशी बोगद्याच्या भागात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील तिसरी लेन ड्रम व पत्रे तसेच तात्पुरती भिंत उभारून बंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The third lane of the Khandala gorge open